उमरगा / प्रतिनिधी-

 युपीएससी परीक्षा 629 रँकने उत्तीर्ण झालेले तालुक्यातील जवळगा ( बेट ) येथील रहिवाशी निलेश श्रीकांत गायकवाड यांची भारतीय पोलीस सेवेपदी निवड झाली आहे.संघ लोकसेवा आयोगाने मंगळवार दि.23 नोव्हेंबर रोजी ही निवड जाहीर केली आहे.

देशातील असंख्य तरुणांमध्ये आयपीएस पदाविषयी प्रचंड आकर्षण आहे. अनेकज परीक्षेला बसतात, मात्र काही मोजकेच कष्टाळू आणि हुशार विद्यार्थी अंतिम निवडीत स्थान मिळवू शकतात.या सेवेशी निगडीत आव्हाने आणि जबाबदाऱ्या आहेत, म्हणून संघ लोकसेवा आयोगाद्वारे अशा उमेदवारांची निवड केली जाते.IPS मध्ये निवडलेल्या उमेदवारांना सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी, हैदराबाद येथे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवाराला जे राज्य केडर मिळाले आहे त्या राज्यात नियुक्त केले जाते. या निवडीबद्दल निलेश गायकवाड यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


 
Top