परंडा  / प्रतिनिधी-

भारतीय जनता पार्टी प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर , आ. राणाजगजितसिंह पाटील  यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी व जिल्हा उद्योग केंद्र उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील प्रत्येक बुथ वर एक उद्योग अशा कार्यक्रमाचे उद्घाटन परंडा येथे आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांच्या संपर्क कार्यालय परंडा येथे झाले. 

  तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेतकऱ्यांना उद्योग विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अगोदर सक्षम व्हावे आत्मनिर्भर होऊन इतरांना मदत करून याविषयी माहिती भाजपा जिल्हा उद्योग आघाडीचे   शुशांत भुमकर यांनी दिली. तसेच विविध योजनांची माहिती प्रा. किरण आवटे सर व जिल्हा उद्योग निरिक्षक सुरेश पवार यांनी मार्गदर्शन करून दिली..

  यावेळी उद्योग आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत पाटील, तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, सरचिटणीस विठ्ठल तिपाले, ॲड. तानाजी वाघमारे, रमेश पवार, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अनिल पाटील, निशीकांत क्षिरसागर, प्रमोद लिमकर, सागर पाटील, शरद कोळी व तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top