तुळजापूर / प्रतिनिधी-

येथील शुक्रवार पेठ भागातील आठवडा बाजार येथील “ सुरेख स्मृती “ विश्रामगृहाची डागडूजी करणे बाबतचा ठराव सर्वसाधारण सभेमध्ये घेवून त्यास मंजूर करून घेण्याची  .मागणी काँग्रेस   नगरसेवक सुनिल रोचकरी यांनी मुख्याधिकारी - नगराध्यक्ष  यांना निवेदन देवुन केली आहे.

 नगरपरिषद अंतर्गत आठवडा बाजार येथे “ सुरेख स्मृती विश्रामगृह बांधण्यात आले आहे. या विश्रामगृहाची सध्याची  अवस्था  अतीशय खराब झालेली असून या विश्रामगृहातील लाईट बंद आहेत , बाथरुमचे दरवाजे तुटलेल्या अवस्थेत आहेत , रुममध्ये पाण्याची सोय नाही त्यामुळे येथे वराह व कुत्रे घाण  करीत आहेत . तसेच अवैध कामासाठी या विश्रामगृहाचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे . तुळजापूर शहरामध्ये श्री देविजींच्या दर्शनासाठी येणारे महत्वाचे व अतिमहत्वाचे तसेच दर्शनार्थी भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे . या भाविकांच्या सोईकरीता “ सुरेख स्मृती ” विश्रामगृह उपलब्ध व्हावे यासाठी सदर विश्रामगृहाची डागडुजी करणे गरजेचे आहे . तरी . मुख्याधिकारी / नगराध्यक्षश्र साहेब यांनी “ सुरेख स्मृती ” विश्रामगृहाची डागडूजी बाबतचा ठराव येणारे सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात येवून त्यास मान्यता द्यावी,असे निवेदनात . म्हटलं आहे याची  प्रत माजी मंञी आ.  मधुकर चव्हाण यांना सादर केली आहे

 
Top