तुळजापूर / प्रतिनिधी-

तिर्थक्षेञ तुळजापूरात दुचाकी वाहन पार्किंग प्रश्न गंभीर बनला असल्याने यावर प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी दुचाकी चालकांनकडुन केला जात आहे.

 श्री तुळजाभवानी दर्शनार्थ तुळजापूर पंचक्रोषीतील व  मध्यमवर्गीय भाविक वर्ग दुचाकी वरुन येण्यास प्राधान्य देत असल्याने शुक्रवार, रविवारी, मंगळवार पोर्णिमा या दिवशी तिर्थक्षेञी हजारो  दुचाकी दाखल होतात माञ यांच्यासाठी वाहन पार्किंग करण्याची सोय नसल्याने भाविक या दुचाकी  मंदीर महाध्दार समोर भवानी रोड मध्ये लावत आहे. त्यामुळे भवानी रोडवर मध्य भागी लांबचा लाब रांगत आहे. याचा ञास पायी चालत येणाऱ्या भाविकांना होत आहे. पुजेचे साहित्य विक्री करणारे  मंदीर परिसर व भवानी रोडवरील दुकानदार दुचाकी दुकानासमोर रोड मध्यभागी  गाडी लावा व पुजेचे साहित्य  घ्या असे सांगुन भवानी रोडवर दुचाकी लावत असल्याने भवानी रोड दुचाकी चे वाहनतळ बनले आहे.   

 
Top