तुळजापूर / प्रतिनिधी- 

श्री तुळजाभवानी मंदिरातील धार्मिक विधी सुरू करण्याबाबत श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांना दि.२३ नोव्हेंबर रोजी निवेदन देण्यात आले.

निवेदनात असे नमूद केले आहे की, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी हे शक्तीपीठ असून या ठिकाणी तुळजाभवानी मातेला अभिषेक गोंधळ ,जावळ,ओटी भरणे,सिंहासन अशा प्रकारच्या १६ धार्मिक विधी केल्या जातात. या विधी भक्तांच्या भावनिक असल्यामुळे सुरू होणे गरजेचे आहे. तरी श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाच्या वतीने मागणी होत आहे. या निवेदनावर उपाध्यक्ष विपिन शिंदे यांची स्वाक्षरी आहे. 

 
Top