जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक आज जिल्हाप्रमुख तथा आ. कैलास घाडगे - पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्यासह इतर उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या सभागृहामध्ये पार पडली.
 सदर बैठकीत पूर्वी झालेल्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीच्या इतिवृत्ताचे वाचन करून पुढील काळात जिल्ह्यातील कामे करावयाच्या रस्त्यांबाबत चर्चा केली.यावेळी उस्मानाबाद शहरांतील वरुडा रोड आणि तुळजापूर नाका ते डीमार्ट पर्यंतच्या सर्विस रोड बाबत चर्चा करून हा प्रश्न लवकरात लवकर सर्वांच्या संमतीने सोडविण्यात येईल असे सांगितले.उस्मानाबाद शहरालगतच्या रोडवर स्ट्रीट लाईट बाबतचे प्रश्न मांडून या लाईट लवकरात लवकर बसवून पूर्ण करून देणे बाबतचे निर्देश खा.ओमप्रकाश राजनिंबाळकर यांनी संबंधितांना दिले.
रस्त्यावरील अपघात वाढत असून त्यामध्ये जास्तीत जास्त तरुण पिढी चे प्रमाण असून यामुळे  पूर्ण कुटुंब  उध्वस्त होत आहे त्यामुळे असे अपघात रोखण्यासाठी पोलीस व परिवहन विभागाने प्रयत्न करावे अशा सूचना खासदर ओमराजे निंबाळकर यांनी दिल्या आहेत पुढे बोलताना महाराष्ट्रातील एक लाख अपघातांमागे अपघाताचे प्रमाण पाहता आपल्या जिल्ह्याचा चौथा क्रमांक लागतो ही बाब गंभीर आहे या बाबीचा विचार करता अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी हेल्मेट आणि सीटबेल्टची सक्ती करण्याबाबत सूचना खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी पोलिस अधीक्षकांना केल्या. उस्मानाबाद शहरातील सम - विषम पार्किंगच्या संदर्भात चर्चा होऊन 15 नोव्हेंबर पासून शहरातील जिल्हा न्यायालयाजवळील आणि जिल्हाधिकारी महोदयांचे निवासस्थान ते माऊली चौक हे रस्ते पूर्णपणे वन वे करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 तसेच जिल्ह्यातील इतर नगरपालिका क्षेत्रांतर्गत वन वे बाबतही लवकरात लवकर सर्वसमावेशक निर्णय घेण्यात येईल असे यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. काकरंबा ता.तुळजापूर येथील उड्डाणपुलाच्या संदर्भातही चर्चा करून येत्या सहा महिन्यांमध्ये या पुलाचे काम तातडीने सुरू करण्याबाबतच्या सूचना खा. ओमप्रकाश राजनिंबाळकर यांनी दिल्या. उस्मानाबाद ते उजनी रस्त्याच्या कामासाठी लागणाऱ्या जमिनीची मोजणी झालेली असून लवकरच सदर रस्त्यांच्या हद्द निश्चित करून काम सुरू होईल असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. उमरगा ते सोलापूर रस्त्याचे काम सुद्धा गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबित असून सदर रस्त्याचे कंत्राटदार काम करत नसल्यास त्या ठिकाणी दुसरा कंत्राटदार नेमून लवकरात लवकर काम पूर्ण करण्याबाबत आणि याप्रमाणेच कळंब ते लातूर आणि औसा ते तुळजापूर रस्त्याच्या कामाबाबत सुद्धा संबंधित कंत्राटदारास विहित मुदतीत काम पूर्ण करण्याबाबतच्या सूचना खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या
या बैठकीस जिल्हाधिकारी श्री कौस्तुभ दिवेगावकर, पोलिस अधीक्षका नीवा जैन, प्रादेशिक वाहतूक अधिकारी नेरपगार साहेब आणि इतर सर्व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद रस्ते विभाग, आरोग्य विभागाचे अधिकारी, नागरिक पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top