तेर / प्रतिनिधी 

जगातील पर्यटक ,अभ्यासक उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे यावे म्हणून जागतिक वारसा स्थळ नामांकनासाठी तेरमध्ये जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

राज्य शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचनालय यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाने आणि तेरणा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सामाजिक दायित्वातून वास्तुविशारद तेजस्विनी आफळे यांची जागतिक वारसा स्थळ नामांकनाचा प्रस्ताव करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

आ. राणाजगजिसिंह पाटील यांनी पुरातत्व व संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गरगे यांची भेट घेऊन तेरचा बृहत विकास आराखडा व जागतिक वारसा स्थळ नामांकनासाठी प्रस्ताव तयार करण्याबाबत आग्रही मागणी केली. याबाबत सविस्तर चर्चा होऊन तेरणा चारीटेबल ट्रस्ट यांच्या सामाजिक दायित्वातून सदर प्रस्ताव तथा बृहत विकास आराखडा तयार करण्याबाबत पुरातत्व संचानालय स्तरावरून नामीकीत सूची वरील वास्तुविशारद यांना आवाहन करण्यात आले .या कामासाठी पाच वास्तुविशारद यांनी स्वारस्य दाखविले. त्यानुसार तेर या ठिकाणी सदर वास्तुविशारद यांच्यासमवेत प्राथमिक बैठक संपन्न झाली. यानंतर पुरातत्व विभागाचे प्रतिनिधी म्हणून सहाय्यक अभिरक्षक अमोल गोटे, तेरचे सरपंच नवनाथ नाईकवाडी, तेरचे ग्रामविकास अधिकारी प्रशांत नाईकवाडी, तगर अभ्यासक रेवणसिद्ध लामतुरे, ह .भ .प .दिपक खरात, तेरणा ट्रस्टचे समन्वयक म्हणून बाळकृष्ण लामतुरे यांची समिती नियुक्त करण्यात आली. या समितीने सर्व वास्तुविशारद यांना तेर व परिसरातील  पुरातत्वीय वास्तु ,पुरावशेष, स्थळे यांची प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन माहिती दिली. पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत व समितीच्या समोर वास्तुविशारद यांनी विकास आराखडा व जागतिक नामांकनासाठीचा प्रस्तावाचे प्राथमिक सादरीकरण सादर केले. या वास्तुविशारदातून स्मिता पाटील यांची बृहत विकास आराखडा तयार करण्यासाठी  व वास्तुविशारद तेजस्विनी आफळे यांची जागतिक वारसा नामांकन स्थळ प्रस्ताव तयार करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

 
Top