कळंब / प्रतिनिधी-

 तालुक्यातील सौंदना (आंबा) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते जिवनराव गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्याध्यक्ष प्रा.शिवाजी लकडे यांच्या नियोजनात आढावा बैठक संपन्न झाली. 

 या बैठकीत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीची रणनिती आखण्यात आली. याप्रसंगी तालुकाध्यक्ष प्रा.श्रीधर भवर, नितीन बागल, अ‍ॅड.प्रविण यादव, रमेश देशमुख, गुणवंत पवार, संदीप तांबारे,  प्रा.तुषार वाघमारे, प्रकाश बावणे, आत्माराम बिक्कड, आदित्य गोरे, तुषार पवार, पद्माकर पाटील, समाधान बाराते, विठ्ठल कोकाटे, सुहास कवडे, भीमा हगारे, स्वप्निल चिलवंत, शोभा मस्के, सुनंदा भोसले, सलमा सौदागर, संध्या तोडकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top