उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्त्या अर्चनाताई अंबुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे पत्र भाजपा कार्यालय याठिकाणी देण्यात आले.

भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केली आहे. अंबुरे यांनी बचत गट व उद्योगाच्या माध्यमातून अनेक महिलांच्या संपर्कात असून त्यांनी महिलांचे जाळे उभे केले आहे. तसेच त्यांनी यापूर्वी जिजाऊ ब्रिगेडच्या महिला जिल्हाध्यक्ष म्हणून देखील काम केले आहे.

 
Top