उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कायद्यांच्या अज्ञानामुळे आणि साक्षरता अभावी नागरिकांना अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे विधी सेवा प्राधिकरणामार्फत विविध शासकीय योजनांची जनजागृती आणि लाभार्थींना प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी महा मेळाव्याचे आयोजन केल्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर पेठकर यांनी स्पष्ट केले.

आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात गुरुवारी महामेळावाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. या मेळाव्या दरम्यान विविध योजनांच्या लाभार्थींना प्रातिनिधीक स्वरूपात प्रमाणपत्र आणि धनादेशाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयातील लघु उद्योग, रेशीम उद्योग,पशुपालन, कृषी विषयक,समाज कल्याण इत्यादी योजनांची माहिती देण्यासाठी विशेष स्टॉल लावण्यात आले होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव वसंत यादव यांनी आभार मानले. यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, अतिरिक्त पोलिस नवनीत कनवत, अपर जिल्हाधिकारी रुपाली आवले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डि.के. पाटील, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव वसंत यादव, न्यायधीश एन.एच.मखरे, विधी सेवा मंडळाचे अध्यक्ष नितीन भोसले सर्व न्यायिक अधिकारी व विविध कार्यालयाचे प्रमुख उपस्थित होते.

 
Top