तुळजापूर / प्रतिनिधी-

सामाजिक हितासाठी होत असलेल्या न.प.च्या हद्दीतील रस्त्याच्या कामामध्ये काही मंडळी  कडून बाधा आणत असल्याने  अशा मंडळीवर शासकीय नियमानुसार कारवाई करुन नियमाचा अधीन राहुन रोड तयार करावा, अशी मागणी घाटशिळ भागातील प्रतापटाँकीज मागील रहिवाशांनी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांना  निवेदन देवुन  केली .

निवेदनात म्हटलं आहे की, घाटशिळ रोड तुळजपूर ते जुने प्रताप टॉकीज या ठिकाणी सिमेंटचा रोड नगरपालिकेच्या माध्यमातुन होत आहे . या कामासाठी जवळपास दोन वर्षाचा कालावधी गेलेला असून आता काम चांगल्या पध्दतीने पूर्णत्वास जात  आहे .  परंतु रोडच्या कोप - यावरील काही मंडळी . त्यास अडथळा करत आहेत . सदरील जागा ही मठाची असून त्यावर मठाचा अधिकार आहे . मठातील महाराजांनी यांच्या परवानगीने रोडसाठी जागा दिलेली आहे व सदरील जागेतील अतिक्रमण हे नगरपालिकेने काढून रोड करावा,अशी परवानगी दिलेली आहे . त्या जागेतील सर्व अतिक्रमण नगर पालिकेने काढून घेतलेले आहे . परंतु हे पाच फुटाच्या अंतरासाठी रोडच्या कामात अडथळा आणत आहेत. ते शासकीय कामास विलंब तसेच अडथळा निर्माण करत आहेत . तरी,शासकीय कामात अडथळा निर्माण करत असलेल्या व्यक्तीवरती शासन कलमानुसार याग्य ती कार्यवाही करण्यात यावी . तसेच नगरपालिकेने तो अडथळा दूर करून योग्य त्या पध्दतीने रोड करून घ्यावा,अशा मागणीचे निवेदन या भागातील रहिवांशानी दिले

 
Top