तुळजापूर / प्रतिनिधी-

 महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेच्या मंदीरात दिपावली निमित्ताने गुरुवार दि ४ व  ५ नोव्हेंबर 2021रोजी खालील प्रमाणे  विविध  धार्मिक  कार्यक्रम होणार   आहेत.

दिपावली सणातील प्रमुख असा धार्मिक विधी  आगीची ज्वाला खांद्यावरुन वाहुन नेला जाणारा भेंडुळी उत्सव गुरुवार दि ४रोजी सांयकाळी संपन्न होणार आहे. गुरुवार दि. ४ रोजी नरकचतुर्थी दिनी पहाटे श्रीतुळजाभवानी मुर्तीस अभ्यंगस्नान सांयकाळी टोळ भैरव मंदीरातुन आगीची ज्वाला वाहुन नेली जाणारी भेंडुळी प्रज्वलन नंतर श्रीतुळजाभवानी मंदीरात आगमन मंदिरातुन राजेशहाजीमहाध्दार मार्ग कमानवेस भागातील श्रीडुल्या हनुमान मंदीरात भेंडुळी शांत करण्यात येवुन या उत्सवाचा  सांगता होणार आहे.

 
Top