तुळजापूर  / प्रतिनिधी:

मातंग समाजाला स्वतंत्र अ.ब.क.ड नुसार लोकसंखेचा प्रमाणात आरक्षण मिळावे या सह आणखी  विविध सामाजिक मागणी संदर्भात मानवहीत लोकशाही पार्टीच्या वतीने एक दिवसाचे उपोषण (दि.२५)रोजी तुळजापूर तहसील कार्यालया समोर करण्यात आले.

 तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात विविध मागण्यामध्ये प्राधान्याने मातंग समाजाला स्वतंत्र अ.ब.क.ड नुसार लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण माळावे,साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळास वाढीव निधी देण्यात यावा,मातंग समाजावर अन्याय अत्याचाऱ्याच्या विरोधात कडक कारवाई करुन पिडीत कुटूंबास लवकरात लवकर न्याय द्यावा,

तुळजापूर शहरातील डॉ. आण्णाभाऊ साठे नगर येथे व स्मारकाच्या नियोजित जागेवर विद्युत रोषणाई व वाँल कंपाउंड चे काम तात्काळ करावे आदी मागण्यांचा समावेश आहे.हे निवेदन  जिल्हा युवक अध्यक्ष किरण   कांबळे,जिल्हाध्यक्ष किरण कांबळे हणमंतराव पाटुळे यांच्या सह सदस्यांनी दिले. या आंदोलनाला विविध संघटनांनी पाठींबा दिला.


 
Top