तुळजापूर / प्रतिनिधी-

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस तुळजापूरच्या वतीने आयपीएलच्या धर्तीवर टीपी एल क्रिकेट स्पर्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे  मा. नगरसेवक श्रीकृष्ण सूर्यवंशी यांच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य क्रिकेट स्पर्धेचं  गुरुवार  दि. 25 रोजी  उद्घाटन ज्येष्ठ नेते  दिलीपनाना मगर, माण् नगराध्यक्ष गणेश कदम यांच्या हस्ते करण्यात आले.

 पहिला सामना  हरीश भावड्या चॅलेंजर विरुद्ध बॉस बॉईज या संघात खेळवण्यात आला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, काँग्रेसचे युवा नेते अमोल कुतवळ,राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष संदीप गंगणे,युवक तालूका कार्याध्यक्ष शरद जगदाळे,सुभाष कदम,सामाजिक कार्यकर्ते सागर कदम,महेश चोपदार,गणेश नन्नवरे,सागर सूत्रावे,महेश गरड,शुभम नेपते,सुदर्शन पवार,चेतन शिंदे,बिटू दरेकर,प्रदीप इंगळे,हरीश रोचकरी, महेश पवार,गोपाळ पवार आदी उपस्थित होते.

स्पर्धतील,विजेत्यांना  प्रथम पारितोषिक 51000, द्वितीय पारितोषिक 31000, तृतीय पारितोषिक 11000 अशा स्वरूपात देण्यात येणार आहे. स्पर्धेचे  बक्षीस वितरण  १२/१२/२०२१रोजी करण्यात येणार आहे.


 
Top