उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तालुक्यातील बोरगाव (राजे) येथील साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. या तलावातील जलपूजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर कारखाना संस्थापक अध्यक्ष अरविंद गोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

कारखान्याचे संचालक अ‍ॅड निलेश बारखडे पाटील यांच्या संकल्पनेतून हे जलपूजन करण्यात आले. याप्रसंगी सिद्धनाथ पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष सहदेव ढवळे, संचालक कुंद पाटील, सतिश मुंगळे, शाखा अभियंता शेळके, बंडगर, कामेगावचे सरपंच गोविंद कदम, संपतराव देशमुख, भैरवनाथ बचाटे, नाना कदम, चिखलीचे देविदास जाधव, उत्तरेश्वर सुरवसे, व्यंकटराव पाटील, बबलू चोबे, जयराम चोबे, मुकडे, निवृत्ती मते, हनुमंतराव चौबे, पाडोळीचे भारत गुंड, विकास ढवळे, सागर गुंड, बोरखेडा येथील दिगंबर मुंडे, मनोज कवडे, बेंबळीचे ज्ञानोबा निकम, बाबा शेख, बोरगाव राजे सरपंच नाना ढवळे, उपसरपंच चैतन्य शिंदे, सोसायटी चेअरमन व्यंकट ढवळे, तंटामुक्ती अध्यक्ष Aअ‍ॅड दत्तात्रय शिंदे, माजी सरपंच बप्पा नांदे, दादा पठाण आदी उपस्थित होते. यावेळी कामेगाव ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच गोविंद कदम तर बोरगाव ग्रामपंचायत यांच्या वतीनेही अरविंद गोरे, अ‍ॅड निलेश बारखडे आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी अरविंद गोरे यांनी या साठवण तलावाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपलब्ध पाण्याचा काटकसरीने जपून वापर करावा असा संदेश दिला. कारखान्याचे धोरण, चालू गाळप हंगामाची माहिती ग्रामस्थांसमोर मांडली.

 
Top