तुळजापूर / प्रतिनिधी-

 सिने अभिनेते खासदार  डॉ. अमोल कोल्हे, व त्यांच्या सौभाग्यवती   .डॉ.अश्वीनी अमोल कोल्हे यांनी शनिवार दि.१२ रोजी  सपत्नीक महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचे कुलधर्मकुलाचार  करुन यथासांग पुजा केली.

देवीदर्शनानंतर मंदीर संस्थानाच्या वतीने तहसिलदार योगीता कोल्हे यांनी श्री तुळजाभवानी मातेची प्रतिमा देऊन सन्मान केला. याप्रसंगी व्याख्याते शिवरत्न शेटे , शेषनाथ वाघ, पुजारी धन्यकुमार मस्के, मंदीर संस्थानचे इंतुले, विश्वास कदम ,परमेश्वर,सातपुते,प्रकाश पेंदे,मयुर पेंदे,रहेमान काझी, पांडूरंग भोसले, सार्थकी, सत्यहरी वाघ,  खासदार डॉ. अमोल कोल्हे समवेत रसिकांनी छायाचित्रे घेण्यासाठी गर्दी केली होती.

 
Top