उस्मानाबाद /प्रतिनिधी - 

ग्रामसेवक व विमा कंपनीचा घोटाळा उघड झाला असुन घरी बसुन बोगस पीक कापणी प्रयोग करणाऱ्या ग्रामसेवकाला जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी निलंबित केले आहे. शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या ग्रामसेवकाचे जिल्हाधिकारी यांनी  निलंबन केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील भुम तालुक्यातील पेठसांगवी येथे बोगस पीक कापणी प्रयोग बाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे 11 ऑक्टोबर रोजी तक्रार केली होती. पिकांच्या उत्पन्नाचा अंदाज व आढावा काढण्याचे करिता पाठसांगवी येथे सोयाबीन पिकाचा पीक कापणी प्रयोग न राबविता संबंधीत ग्रामसेवक व विमा कंपनीच्या प्रतिनिधीनी चुकीचा अहवाल सादर केला. याबाबत भुम येथील उपविभागीय कृषी अधिकारी यांनी चौकशी करून अहवाल सादर केला. त्यात ग्रामसेवक यु एस कावळे यांनी पीक कापणी प्रयोगाचे काम प्रत्यक्षात न करता केवळ आभासी पद्धतीने उत्पादनाची आकडेवारी नमूद करून अहवाल कृषी विभागास सादर केला. त्यामुळे कावळे यांचे निलंबन करून त्यांच्या विरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित करावी असे आदेश जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांना दिले आहेत.


 
Top