परंडा / प्रतिनिधी :-

पंचायत समिती परंडा सभागृहात प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने नीट परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा पालकांसमवेत सत्कार करण्यात आला.

 दरवर्षी परंडा तालुक्यातून नीट परीक्षेत यशस्वी होणा-या विद्यार्थ्यांचा आलेख उंचावत आहे ही परंडा तालुक्याच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे,या यशस्वी विद्यार्थ्यांचे पाठीवर कौतुकाची थाप द्यावी व यांपासून इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या उदात्त हेतूने हा सत्कार समारंभ करण्यात आला. पुढील वैद्यकीय शिक्षण घेताना जिद्दीने, चिकाटीने अभ्यास करून एक यशस्वी डॉक्टर होऊन समाजातील रंजल्या गांजलेल्यांसाठी सामाजिक भान ठेवत, संवेदनशीलता जपत आदर्श कामासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

   यावेळी अनाळा बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी योगेंद्र खराडे, पंचायत समिती परंडा सहाय्यक प्रशासन अधिकारी चत्रभूज पाखले, कनिष्ठ सहाय्यक प्रशासन अधिकारी रंजना कदम मॅडम, प्रहार शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष वैजीनाथ सावंत, जिल्हा नेते संतूक कडमपल्ले, परंडा तालुका अध्यक्ष विनोद सुरवसे, उपाध्यक्ष शहाजी झगडे, तालुका नेते लक्ष्मण औताडे,पालक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण औताडे, प्रास्ताविक वैजिनाथ सावंत यांनी तर आभारप्रदर्शन विनोद सुरवसे यांनी केले.


 
Top