उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान वाटप न केल्याबद्दल भारतीय जनता पार्टीने सोमवारी राज्यभरात काळ्या फिती लावून राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला.उस्मानाबाद तालुक्यातील बावी येथे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.भाजपने म्हटले आहे की अनुदान न देता शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या राज्य सरकारचा आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वात बावी येथे स्थानिक शेतकऱ्यांसोबत काळ्या फिती लावून राज्य सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. अतिवृष्टीने शेतकरी आधीच मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून राज्य सरकारने हेक्टरी १० हजार रुपये अनुदान जाहीर केले. शेतकऱ्यांना एक प्रकारची आशा होती. दिवाळीआधी अनुदान रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल.मात्र तसे झाले नाही. आमदार राणा पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ६६ टक्के इतकेच अनुदान देण्याचे ठरले आणि त्यातही पहिल्या टप्प्यात ७५ टक्के एवढीच रक्कम शेतकरी बांधवांना त्यांच्या खात्यावर मिळणार आहे.त्यामुळे हे मदत करणारे सरकार नसून फसवणूक करणारे सरकार आहे. यावेळी भाजपचे जिल्हा समन्वयक नेताजी पाटील, भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर तसेच बावी येथील शेतकरी,भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

नुकसान भरपाई म्हणून राज्य सरकारने हेक्टरी १० हजार रुपये अनुदान जाहीर केले. शेतकऱ्यांना एक प्रकारची आशा होती. दिवाळीआधी अनुदान रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल.मात्र तसे झाले नाही. आमदार राणा पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ६६ टक्के इतकेच अनुदान देण्याचे ठरले आणि त्यातही पहिल्या टप्प्यात ७५ टक्के एवढीच रक्कम शेतकरी बांधवांना त्यांच्या खात्यावर मिळणार आहे.त्यामुळे हे मदत करणारे सरकार नसून फसवणूक करणारे सरकार आहे. यावेळी भाजपचे जिल्हा समन्वयक नेताजी पाटील, भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर तसेच बावी येथील शेतकरी,भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top