उस्मानाबाद / प्रतिनिधी-

श्री सिध्दीविनायक ॲग्रीटेक इंडस्ट्रीज लिमिटेड या कारखान्याचा बॉयलर पूजनाचा समारंभ उत्साहात संपन्न झाला.सदरचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष श्री.ओमप्रकाश काका कोयटे यांच्या हस्ते व महाराष्ट्र राज्य मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष श्री.सुरेश आण्णा वाबळे यांच्या प्रमुख उस्थितीमध्ये झाला.

यावेळी संत नागेबाबा मल्टीस्टेट चे अध्यक्ष श्री.कडूभाऊ काळे, लोकमंगल मल्टीस्टेट चे अध्यक्ष श्री.रोहन देशमुख, मोहेकर मल्टीस्टेट चे अध्यक्ष श्री.हनुमंत मडके, रूपामाता उद्योग समूहाचे अध्यक्ष ॲड.श्री.व्यंकटराव गुंड, यशदा मल्टीस्टेट चे अध्यक्ष श्री.सुधीर सस्ते, पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेट चे अध्यक्ष श्री.जयप्रकाश राजेनिंबाळकर, लातूर मल्टीस्टेट चे अध्यक्ष श्री.इसरार सगरे, साईआदर्श मल्टीस्टेट चे अध्यक्ष श्री.शिवाजी आप्पा कपाळे, आदर्श महिला पतसंस्थेचे अध्यक्ष श्री.हनुमंत भुसारे, यशवंत मल्टीस्टेट चे अध्यक्ष श्री.सतीश दंडनाईक, नाथ मल्टीस्टेट चे अध्यक्ष श्री. सिध्देश्वर वायकर, साईराम मल्टीस्टेट चे अध्यक्ष श्री. शाहीनाथ परभने,श्री सिद्धिविनायक परिवाराचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. कार्यक्रमास श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट चे अध्यक्ष श्री.व्यंकटेश कोरे, श्री.सतीश सोमाणी, ॲड.श्री.सचिन मिनियार, प्र.का.सदस्य ॲड.अनिल काळे, तुळजापूर तालुकाध्यक्ष श्री.संतोष बोबडे, श्री.साहेबराव घुगे, श्री.नागेश नाईक, श्री.शिवाजी बोधले, श्री.नारायण नन्नवरे, श्री.विजय शिंगाडे, श्री.बालाजी शिंदे, श्री.विजय रोकडे,  श्री सिध्दीविनायक ॲग्रीटेक इंडस्ट्रीज लिमिटेड चे कर्मचारी व सिध्दीविनायक परिवाराचे हितचिंतक व परिसरातील शेतकरी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सिध्दीविनायक परिवाराचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी केले.  आपल्या प्रास्ताविकामध्ये तुळजापूर तालुक्यातील व परिसरातील शेतकऱ्यांची निकड लक्षात घेऊन या भागात कारखाना उभारण्याचा संकल्प केल्याचे सांगितले व कारखान्यामध्ये ऊस घातलेल्या दिवसापासून १५ दिवसामध्ये उसाचे एकरकमी बिल शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होईल याची खात्री सुद्धा दिली. अध्यक्षीय भाषणामध्ये ओमप्रकाश काका कोयटे यांनी श्री सिध्दीविनायक परिवाराच्या या नवीन प्रकल्पाच्या उभारणीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. प्रतीक देवळे यांनी केले तर आभार प्रदर्शन गणेश कामटे यांनी व्यक्त केले.


 
Top