उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  मंत्री एकनाथ शिंदे , ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हाप्रमुख तथा आ.  कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंद  राजेनिंबाळकर यांच्या उपस्थितीत भाजपचे माजी नगराध्यक्ष दत्तात्रय  बंडगर यांचा मंत्री शिंदे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश झाला. 

 बुधवार दि. २४ नोव्हेंबर रोजी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी  प्रवेश सोहळा पार पडला. 


  दत्ता  बंडगर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे  आगामी न.प.निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. डाॅ.पद्मसिंह पाटील व राणाजगजितसिंह पाटील यांचे निष्ठावंत म्हणून ओळख असणारे बंडगर यांच्या प्रवेशाने भाजपला धक्का बसल्याचे मानले जात आहे.  

 
Top