उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद शहरातील एस.आर. पंशन हॉलसमोर लावलेली दुचाकी चोरीला गेल्याची घटना 28 नोव्हेंबर रोजी दुपारी घडली आहे. या प्रकरणी दुचाकी मालकाने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी सांगितले की, नळदुर्ग येथील सय्यद मुजीब अहमद समदाणी यांनी त्यांची मोटारसायकल क्र. एम.एच. 25 झेड 6171 ही दि. 28. नोव्हेंबर रोजी उस्मानाबाद येथील एस.आर. फंक्शन हॉलसमोर लावली होती. 12.00 वा. मो.सा. त्यांना लावल्या जागी न आढळल्याने अज्ञात व्यक्तीने ती चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या समदाणी यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


 
Top