तेर / प्रतिनिधी 

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील वैराग्य महामेरू वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हभप रघुनंदन महाराज पुजारी यांची महाराष्ट्र राज्य वारकरी प्रबोधन सेवा महामंडळाच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. 

यावेळी वारकरी प्रबोधन सेवा महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष हभप रमेश महाराज वाघ , कार्याध्यक्ष हभप तुकाराम महाराज राठोड , हभप सिध्देश्वर महाराज , हभप गोपाळ महाराज नरके , हभप कालिदास महाराज नाईकनवरे आदि मान्यवरांच्या हस्ते हभप रघुनंदन महाराज पुजारी यांना निवडीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वारकरी प्रबोधन सेवा महामंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रघुनंदन महाराज पुजारी यांचे कौतुक होत आहे

 
Top