उस्मानाबाद / प्रतिनीधी : 

केवळ व्यावसायिकताच न जोपासता दर्जेदार आणि गुणकारी औषध उत्पादना बरोबरच वंदनीय अशी सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कार्य मैनकाइंड फार्मा कंपनीने केले आहे. देशातील अग्रगण्य अशा या औषध उत्पादक कंपनीने  उस्मानाबाद येथील कोरोना योध्दा पोलिस नाईक स्व. सुनिल मैंदर्गे यांच्या कुटूंबियांना तिन लाखांची आर्थिक मदत करुन मोलाचे सहकार्य केले आहे.

कोरोना प्रादुर्भावाने मागच्या दिड दोन वर्षापासून संपूर्ण जग जेरीस आले आहे. अशा परिस्थितीत जनसेवारत आपले कर्तव्य बजावणारे महाराष्ट्र पोलीस दलातील उस्मानाबादचे कर्मचारी पोलीस नाईक स्व. सुनील मैंदर्गे यांचा कोरोनाची लागन झाल्याने अकाली त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांच्या कुटूंबावर मोठे संकट कोसळले होते. अशा परिस्थितीत कुटूंबातील एक सदस्य आणि घरताती करती व्यक्ती गेल्याचं दु:ख कोणीही भरुन काढू शकत नाही पण काही प्रमाणात त्यांच्या कुटूंबाला आर्थिक मदत करुन दिलासा देण्याचा प्रयत्न येथील मैनकाइंड फार्मा कंपनीने केला आहे.

कोविड काळातील फ्रंटलाईन वॉरियर्स म्हणून कार्यरत असणारे डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि फार्मासिस्ट यांच्यासाठी मॅन काइंड फार्मा या कंपनीकडून सीएसआर निधीसाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यानुसार उस्मानाबाद येथील पोलीस कर्मचारी कै. मैंदर्गे यांचे 15 एप्रिल 2021 रोजी नीधन झाले होते.  त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या कुटुंबियांना हातभार म्हणून हा तीन लाखांचा धनादेश काल शनिवार दि. 30 ऑक्टोबर 2021 रोजी उस्मानाबादच्या पोलिस अधीक्षक नीवा जैन यांच्या हस्ते व मैनकाइंड कंपनीचे विभागीय प्रमुख दिपक खांबे, यांच्या हस्ते देण्यात आला. याप्रसंगी मॅनकाईड फार्माचे शाम गुरव  आणि उस्मानाबाद पोलीस दलातील अनेक पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

 
Top