उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हास्तरीय लोकशाही दिन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या उपस्थितीत आज घेण्यात आला .  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहातील या   लोकशाही दिनात  24 अर्ज प्राप्त झाले होते .

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी,उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शुभांगी आधळे,उप मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नीतीन दाताळ, महाराष्ट्र राज्य वीज  वितरण कंपनीचे मुख्य अभियंता कयुम मुलानी, प्रकल्प अधिकारी  ( ग्रामीण )चे प्रतिनिधी डि.टी.जाधव आदी  उपस्थित होते.                              

  यावेळी  प्राप्त झालेल्या  24 अर्जनमध्ये  कृषी, वीज वितरण कंपनी , सार्वजनिक बांधकाम विभाग,पाणंद रस्ते,विज जोडणी आणि महसूल आदी  या विभागांशी संबंधित आहेत . तक्रारदाराच्या अर्जावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी योग्य ती कार्यवाही करावी.अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी,अडचणी यांची न्याय आणि तत्परतेने शासकीय यंत्रणेकडू सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपायोजना म्हणून जिल्हा स्तरावर लोकशाही दिन प्रत्येक महिन्यांच्या पहिल्या सोमवारी घेण्यात  येतो.कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे माहे-मार्च 2021 पासुन लोकशाही दिन बंद करण्यात आला होता.परंतु सध्या उस्मानाबाद जिल्हयामध्ये कोविड-19 चा प्रादुर्भाव कमी झाल्याने दि.1 नोव्हेंबर-2021 रोजी (सोमवार) सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय,उस्मानाबाद येथील सभागृहात लोकशाही दिन आयोजित करण्यात आला.

 
Top