उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण उस्मानाबाद यांचेकडून आझादी का अमृत महोत्सव निमित्त विधी सहाय्यता समितीमार्फत जिल्हा कारागृह उस्मानाबाद येथे आज दिनांक ३ ऑक्टोंबर रोजी संविधान व कायद्याबाबत जनजागृती करण्यात आली प्रास्ताविकपर भाषणात ॲड ज्योती बडेबर यांनी जिल्हा कारागृह येथे असलेल्या बंदी महिलांसाठी त्यांचे अधिकार जबाबदारी संविधानात्मक कर्तव्य महिला विषयक कायदे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचे काम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या मार्फत विधी सहाय्यता समिती कार्य करत असून याचा लाभ आतापर्यंत अनेक महिलांनी घेतला असल्याचे महत्त्व यावेळी विशद करण्यात आले कोणत्याही महिलेला कायदेविषयक सल्ला किंवा अधिकाराबाबत काही माहिती हवी असेल तर विधी सहाय्यता समितीकडे संपर्क करण्याचे आवाहन विधिज्ञ मायादेवी सरवदे विधिज्ञ कल्पना निपाणीकर यांनी केले मार्गदर्शन पर विचार विधी शाखेची विद्यार्थिनी प्रियदर्शनी स्वामी जामीन विषयक माहिती ॲड दिपाली जहागिरदार यांनी तर ॲडअरुणा गवई  कोमल गिरी यांनीही मार्गदर्शन केले

    यावेळी व्यासपीठावर ॲड. मायादेवी सरवदे,ॲड.ज्योती बडेकर ॲड.दिपाली जहागिरदार ॲड.कल्पना निपाणीकर ॲड.अरुणा गवई ॲॅड.अश्विनी सोनटक्के ॲड.द्वारका देवळे ॲड.अर्चना दोरणालिकर कारागृहातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी विधी शाखेच्या विद्यार्थ्यांचे योगदान खूप मोलाचे ठरले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द्वारका देवळे यांनी केले


 
Top