उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 कळंब तालुक्यातील  दुधाळवाडी येथे  स्वदेशी  पंचगव्य गुरुकुल व संशोधन केंद्र योग व निसर्गोपचार आणि येडेश्वरी गोशाळा यांच्या संयुक्त विद्यमानाने  दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर ३ ऑक्टोबर रोजी संपन्न झाले.  या शिबिराचे उद्घाटन डॉ नवनाथ दुधाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अरुण शाळू ,  सुवर्णा यादव दुधाळवाडीचे सरपंच भिवाजी सिरसाट ,उपसरपंच कस्तुरबाई लाटे उपस्थित होते.

 या शिबिरामध्ये देशी गाईच्या तुपातील बाम, पंचगव्य धूप,गो मंजन,गो धूपबत्ती गोबर पासून वीट पणत्या अंगाचे साबण पंचगव्य बेड कामधेनू बाम जप माळ गोबर गणपती भस्म अशा एकूण १० ते१५ प्रकारच्या वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर दर महिना हे प्रशिक्षणार्थी १० हजार ते ३० हजार रुपयापर्यंत उत्पन्न घेऊ शकतात याबाबत मार्गदर्शन करण्यात आले

 या शिबिरासाठी कोल्हापूर , मुंबई , पुणे , रत्नागिरी , सांगली ,बिहार , नाशिक , परभणी , लातूर , परळी , सोलापूर , सातारा , संपूर्ण महाराष्ट्रातून व भारतातून नागरिक दाखल झाले होते.


 
Top