तेर  / प्रतिनिधी 

 तालुक्यातील तेर व परिसरात  27 सप्टेंबरच्या रात्री अतिवृष्टी झाल्यामुळे अनेकांची घरे पडल्यामुळे त्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत तर हाती आलेले पीक वाया गेल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी दिसत आहे .शासनाने तातडीची अर्थिक मदत करून दिलासा देण्याची मागणी शेतकरी व नागरिकांतून होत आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर व परिसरामध्ये 27 सप्टेंबर च्या रात्री अतिवृष्टी झाल्याने तेर व परिसरामध्ये पावसाच्या पाण्याने हाहा:कार  उडाला. रात्री अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने स्वतःचा जीव वाचवीत नागरिक इतरत्र आसरा घेऊन राहिले. अनेकांची घरे अतिवृष्टीने पडल्याने अनेक घरातील संसार उपयोगी साहित्याचे प्रचंड नुकसान झाले.  

 
Top