उस्मानाबाद / प्रतिनिधी-

पेन्शन योजनेसह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने शुक्रवारी (दि.२९) एक दिवसीय ठिय्या आंदोलन केले.

१ नोव्हेंबरपासून महाराष्ट्र राज्य शासनाने पारिभाषिक अंशदान पेन्शन योजना राज्य सरकारी, निमसरकारी जिप कर्मचारी ग्रामसेवक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू केली आहे. २०१५ पासून या योजनेचे रुपांतर राष्ट्रीय पेन्शन योजनेत करण्यात आले आहे.

एकूण १६ मध्ये करण्यात आलेले आहे. १६ वर्षात एनपीएस धारक कर्मचारी, ग्रामसेवकांचे अनुज्ञेय हक्क नाकारले आहेत. यामुळे प्रचंड नुकसान झालेले आहे. एनपीएस हटाव व जुनी पेन्शन लागू करा या एकमेव मागणीसाठी राज्य सरकारी जिप कर्मचारी महासंघ ग्रामसेवक संघटनेच्या वतीने शुक्रवारी (दि.२९) जिल्हा परिषद, पंचायत समिती कार्यालयासमोर राज्यभर एक दिवस ठिय्या आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवकांनी (कंत्राटी वगळून) ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते. निवेदनावर म. रा. ग्रामसेवक युनियन डी. एन. ई १३६ जिल्हा शाखेचे अध्यक्ष डी. ए. चव्हाण, सरचिटणीसाची स्वाक्षरी आहे.


 
Top