उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शहरातील शिवशंभूपंढरी वसाहतीत सत्संग सभागृहात संस्कार वर्ग दीपावली निमित्त पर्यावरणपूरक आकाश कंदील कार्यशाळा घेण्यात आली.

या कार्यशाळेत कागद, वेळूच्या काड्या, कागद, टाकाऊ रिकाम्या खोक्याचा वापर करुन आकाश कंदील तयार करण्याचे प्रात्यक्षिक श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये कार्यरत कार्यानुभव शिक्षिका पी. डी. परतापुरे यांनी दिले. विद्यार्थ्यांनीही मनोभावे आकाश कंदील तयार करुन तोच आपल्या घरासमोर लावण्याचा मानस ठेवला. या कार्यशाळेस संस्कार वर्ग प्रमुख श्यामराव दहिटणकर, शेषनाथ वाघ, अनिल ढगे, श्यामसुंदर भन्साळी आदी उपस्थित होते. दरम्यान, या वर्षीची दीपावली कोविड-१९ मुळे फटाके मुक्त करण्याचा निर्धार उपस्थित कार्यशाळेतील विद्यार्थ्यांनी केला.


 
Top