उस्मानाबाद / प्रतिनिधी

 उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जाची दि.२७ छाननी करण्यात आली. यात ७८ अर्ज वैध ठरले तर १४ अर्ज विविध कारणावरून फेटाळण्यात आल्याची माहिती निवडणूक विभागातील सुत्रांनी दिली.

उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या १४ जागेसाठी पंचवार्षिक निवडणूक घेण्यात येत आहे. निवडणुकीसाठी सत्ताधारी व अन्य उमेदवारांसह एकूण ८६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. बुधवारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयात प्राप्त अर्जाची छाननी करण्यात आली. यात ७४ उमेदवारांचे ७८ अर्ज वैध ठरले तर १२ जणांचे १४ अर्ज विविध कारणावरून फेटाळण्यात आले. २९ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर रोजी दु. ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. १० नोव्हेंबरला उमेदवारांची चिन्हासह अंतिम यादी - प्रसिध्द करण्यात येणार आहे. तर दि.१९ नोव्हेंबरला मतदान व २० नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.


 
Top