उस्मानाबाद / प्रतिनिधी-

डॉ.वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुल गडपाटी,उस्मानाबाद येथील आर.पी. औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयामध्ये नवीनच सुरू झालेल्या डी.फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशित प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वागत समारंभ व ओरिएंटेशन कार्यक्रमाचे दिनांक २० ऑक्टोबर रोजी आयोजन करण्यात आले होते.

 या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून एसबीआय बँक उस्मानाबादचे चीफ सेल्स ऑफिसर शरद खोले,एसबीआय बँक येडशीचे शाखा व्यवस्थापक श्री. महेंद्र भोर व श्री भैरवनाथ निसर्ग मंडळ डी.फार्मसीचे प्राचार्य सूरज ननवरे हे होते.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शेख गाझी यांनी केले यावेळी ते बोलताना म्हणाले की,येणाऱ्या काळात औषध निर्माणशास्त्र क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी असणार आहेत याचा विद्यार्थ्याने अभ्यास करून लाभ घ्यावा.

या कार्यक्रमादरम्यान श्री. भोर व खोले  यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज तसेच उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी एसबीआय बँकेमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली व तसेच औषध निर्मात्यांचे कोविड-19च्या  काळामध्ये केलेल्या कार्या बद्दल गौरवोदगार काढले.तसेच या कार्यक्रमादरम्यान आर.पी. औषधनिर्माणशास्त्र डी.फार्मसीचे विभागप्रमुख प्रा. सुबोध कांबळे यांनी डी. फार्मसी अभ्यासक्रम व नियम यांचे विस्तृत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.तनुजा थिटे यांनी तर कार्यक्रमाचे आभार  डॉ. गणेश मते यांनी मानले.कार्यक्रमासाठी आर.पी. औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, प्रथम वर्ष डी.फार्मसीचे विद्यार्थी व पालक मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते. 


 
Top