उस्मानाबाद / प्रतिनिधी-

मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या वतीने समितीच्या अध्यक्षा नगरसेविका सौ. प्रेमाताई सुधीर  पाटील यांच्या हस्ते शहरातील शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष  शशिकांत खुने, उपाध्यक्ष धर्मराज सूर्यवंशी, सचिव  दत्तात्रय साळुंके, संघटक  बाळासाहेब खोचरे, कायदेविषयक सल्लागार अँड. प्रशांत जगदाळे, कोषाध्यक्ष  मनोज शेलार, प्रसिद्धीप्रमुख श्री. अशोक गुरव, मीडिया सेल प्रमुख श्री. नितीन वीर ,श्री दत्ता जावळे, श्री गुंडोपंत जोशी आदी  पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आल. 

यावेळी मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समितीचे   श्रीमती लैला शेख ,श्रीमती नीता पडवळ, श्रीमती गुंड  ,  स्वप्नील पाटील ,  इंद्रा वाले हे पदाधिकारी व आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी आदित्य  पाटील, श्री. हनुमंत काकडे ,श्री. जयराज खोचरे, प्रा. विवेक कापसे हे मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रदिपकुमार गोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. सूर्यकांत कापसे यांनी केले.

 
Top