भूम/ प्रतिनिधी-

 मौजे हाडोंग्री  येथील पालकर कुटुंबातील तीन सेवानिवृत्त शिक्षक व त्यांच्या दोन भावामध्ये जमिनीच्या वाटण्याच्या कारणावरून अभिमन्यू याचा मुलगा अविनाश याने दिनांक ०७/०१/२०१६ रोजी स्वतःस जाळून घेवून अत्महत्या केली होती . म्हणून अभिमन्यू ने त्याचा भावू बबुवान , अरविंद , मुकुंद आणि अरविंद वा मुलगा व सून नामे महारुद्र व शर्मिला आणि बबुवान ची पत्नी व जावई नामे कौशल्या व दत्तात्रय यांचे विरोधात पोलीस ठाणे भूम येथे तक्रार दिली होती . भूम पोलिसाने सदर प्रकरणात भूम येथील ॲड. सेशन जज्ज यांचे नायायालयात आरोपी विरोधात दोषारोपपत्र दाखल केले . सदर प्रकरण ॲड . सेशन जज्ज   देशपांडे साहेब यांचे समोर चालले . सदर प्रकरण चालू असताना कौशल्या मरण पावली . सदर प्रकरणात मे . कोर्टाने सर्व आरोपीची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली . सदर प्रकरणात आरोपीच्या वतीने भूम येथील जेष्ठ विधिज्ञ श्री . रामहरी मोटे यांनी काम पाहिले त्यांना सहकार्य अॅड . विवेक मोटे , अॅड . विशाल वेदपाठक व अॅड . अमित मोटे यांनी केले .

 
Top