उस्मानाबाद / प्रतिनिधी-

ग्रामदैवत श्री आई धारासुरमर्दिनी देवीच्या मंदिरामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त उस्मानाबाद शहराचे प्रथम नागरीक या नात्याने नगराध्यक्ष श्री.मकरंद राजेनिंबाळकर आणि त्यांच्या सौभाग्यवती यांच्या हस्ते पुजा करून घटस्थापना करण्यात आली.  

तसेच उस्मानाबाद शहरात व जिल्ह्यात आलेल्या अतिवृष्टीच्या  आणि कोरोणाच्या संकटावर मात करण्यासाठी माझ्या बळीराजाला व शहरातील नागरिकाला शक्ती दे हीच  आई धारासुरमर्दिनी चरणी प्रार्थना केली व सर्वांना घटस्थापना आणि नवरात्र उत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी ट्रस्टचे उपाध्यक्ष पोपटराव शेरकर, सचिव बाळासाहेब यादव, विश्वस्त शैलेश कदम, श्रीकांत डोके, अविनाश निरपळ, संजय डोके, सुरेश डोके, आदर्श साळुंके, प्रमोद डोके, अभिजीत इंगळे, मच्छिंद्र हवालदार, ओम यादव, संकेत साळुंखे, अभिजीत कोकाटे,  देवीचे पुजारी हनुमंत कदम आदींसह ट्रस्टचे सर्व सदस्य व नागरिक उपस्थित होते

 
Top