उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथील शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे नूतन पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि.५) पोलिस अधीक्षक नीवा जैन, नुतन अप्पर पोलिस अधीक्षक नवनीत कॉवर यांचा पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला.

शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षक जैन यांची सदिच्छा भेट घेतली. तसेच पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला.

दरम्यान नुतन अप्पर पोलिस अधीक्षक नवनीत काॅवत यांनी नुकताच उस्मानाबाद जिल्ह्याचा पदभार स्वीकारला. याबद्दल त्यांचेही स्वागत करून पुस्तके देऊन सत्कार केला. दरम्यान शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांशी विविध विषयावर चर्चा केली.

यावेळी समितीचे अध्यक्ष शशिकांत खुने, उपाध्यक्ष धर्मराज सुर्यवंशी, सचिव दत्तात्रय साळुंके, कार्याध्यक्ष रवी मुंडे, प्रवक्ता रियाज शेख, अॅड. प्रशांत जगदाळे, कोषाध्यक्ष सुनील मिसाळ, महिला प्रमुख किरण गायकवाड, नितीन फंड, संजय पाटील, यश तावरे, इतर बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर आभारप्रदर्शनाचा कार्यक्रम झाला.

 

 
Top