भूम / प्रतिनिधी-

येथील मौलाली तालीम संघाचा मल्ल चाँद हुसेन सय्यद याची 86 किलो वजन गटातून महाराष्ट्र केसरी साठी उस्मानाबाद जिल्ह्यातून निवड झाली आहे . 

शनिवार दि १६ रोजी उस्मानाबाद येथे पार पडलेल्या स्पर्धेत त्याने हे यश मिळविले . चांद सय्यद याने 87 किलो वजनी गटात हे यश मिळविले . येत्या 21 ,22 डिसेंबर मध्ये सातारा येथे पार पडणार या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत चांद सय्यद हा उस्मानाबाद जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार एकमेव भूम तालुक्याचा पट्टा असणार असल्याने. त्याच्या उत्कृष्ट कामगीरी व यशप्राप्ति मुळे भूम नगरपालिकेच्या वतीने गटनेते संजय गाढवे यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला .

या  वेळी वस्ताद मामु जमादार,नगरसेवक संजय पवार,अविनाश मोटे, सुनील थोरात, सुनील माळी, राकेश जाधव,मुशीर शेख, लालू पवार,बबलू बागवान, पै गाढवे, आदी उपस्थित होते. 
Top