वाशी  / प्रतिनिधी-

 तालुक्यातील मांडवा ग्रामपंचायत मध्ये  दुसरी ग्रामसभा संपन्न झाली.  यावेळी डॉ योगिनी संजय देशमुख यांनी  सरपंच पदी विराजमान झाल्यापासून केलेल्या कामाची माहिती ग्रामस्थांना दिली.नवीन प्रस्तावित कामाबद्दल संपूर्ण माहिती देउन चालू असलेल्या कामावर गावातील तरुण वर्गाने दक्ष राहून देखरेख करावी जेणेकरून कामाचा उत्तम दर्जा आणी कारभार पारदर्शक दिसेल. विकास कामामध्ये चुकीचे प्रकार निदर्शनास आल्यावर  त्वरित कळवावे,असे सरपंचांनी आवाहन केले. 

गाव जलजीवन मिशन योजनेत अंतरभूत झाले असून ही योजना लवकरच कार्यन्वीत होत आहे.नवीन पशुवैद्यकीय दवाखाना,नवीन ग्रामपंचायत भवन,घनकचरा आणि सांडपानी व्यवस्थापन योजना आपल्या गावात राबविण्यात येणार आहे.अंतर्गत सिमेंट रस्ते व नाल्या चे बांधकाम,दलित वस्त्यामधील कामे, बावी सबस्टेशन पासून मांडवा गावाकरिता स्वतंत्र् कृषी फीडर करिता महावितरण कंपनीने ३५ लाख रुपयाचा अंदाजित खर्च दिला असून त्याकरिता डी.पी.डी.सी. कडून निधी तरतूद व्हावी असे आ.डॉ तानाजीराव  सावंत , आ.ज्ञानराज चौगुले,आणि आ.सुजितसिंह यांनी,मा आ राहुल मोटे यांनी नियोजन मंडळाला शिफारस केली असल्याचे सांगितले. ग्रामसभेला लक्षनीय अशी उपस्थिती होती.

 
Top