उस्मानाबाद/ प्रतिनिधी

आपले व आपल्या आईवडीलांचे आणि महाविद्यालयाचे नाव कमवायचे असेल तर आजच्या विद्यार्थ्यांनी आहे त्या परिस्थितीवर मात करत गुणवत्ता मिळवण्यासाठी  प्रचंड अभ्यास करावा व स्पर्धा परीक्षेत टिकण्यासाठी आतापासूनच अवांतर वाचन वाढवावे असे प्रतिपादन रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात १२आॅक्टोंबर रीजी, आयोजित केलेल्या सत्कार समारंभात मा.डाॅ.गणपतराव मोरे(शिक्षण उपसंचालक लातूर विभाग)यांनी सत्काराला उत्तर देताने केले आहे.डाॅ.मोरे हे रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असल्याने व ते सध्या लातूर येथे  उपसंचालक झाल्याबद्दल महाविद्यालयात त्यांचा सत्कार प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांचे हस्ते करण्यात आला.यावेळी प्रा.डाॅ.शांतीनाथ घोडके,उपप्राचार्य प्रा.बबन सूर्यवंशी,प्राचार्य विधाते,प्राचार्य चंदनशिवे उपस्थित होते.

पुढे बोलतांना डाॅ.मोरे म्हणाले की,मी १९८६साली याच महाविद्यालयात १२वी सायन्सला शिकत असतांना त्यावेळेसच्या शिक्षकामुळेच घडलो व माझे शिक्षण श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विविध संस्कार केंद्रातून झाल्याचे समाधान आहे.मी ज्या महाविद्यालयाच्या परीसरात शिकलो तेथे सत्कार स्विकारतांना मन भरून येत आहे.मी वडगावसारख्या खेडेगावातून खडतर प्रवासातून कष्टाने व अभ्यासाच्या बळावर या पदावर पोहचलो आहे.आपण विद्यार्थ्यांनी ही आपल्या मनातील न्युनगंड काढून अभ्यासाबरोबरच अवांतर वाचन करावे व स्पर्धा परीक्षेत टिकावे असे आवाहन केले आहे.

अध्यक्षीय समारोप करतांना प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख म्हणाले की,रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाने या परीसरातील अनेक गरिब विद्यार्थ्यांना घडवल्याने देवानंद शिंदे सारखा विद्यार्थी कुलगुरू झाला तर डाॅ.गणपतराव मोरे सारखा विद्यार्थी शिक्षण उपसंचालक झाला ही बाब संस्थेसाठी,महाविद्यालयासाठी अभिमानाची आहे.आजही महाविद्यालयाची गुणवत्ता टिकुन आहे.

प्रास्ताविक प्रा.बबन सूर्यवंशी यांनी केले.सूञसंचालन प्रा.वैभव आगळे यांनी केले.या समारंभाला महाविद्यालयातील विद्यार्थी,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व सेवक उपस्थित होते.आभार प्रा.पी.डी.क्षीरसागर यांनी मानले.

 
Top