परंडा / प्रतिनिधी  -

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्नित कृषी महाविद्यालय, सोनई येथील सातव्या सत्रात शिकत असलेला कृषिदूत गणेश काळोखे याने कोव्हिड-१९ च्या नियमांना अनुसरून गावांमध्ये  ग्रामीण (कृषी) जागृकता आणि कृषी औद्योगिक कार्यक्रम राबवला. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष समस्या जाणून घेऊन पीक उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले कृषीदुताने ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामस्थांच्या सहकार्याने वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला. 

तसेच तालुक्यातील गोसावीवाडी, डोंजा व देऊळगाव येथील शेतकऱ्यांना विविध प्रकारची प्रात्यक्षिके करून दाखविली. यामध्ये बियाण्यांची उगवण क्षमता वाढविण्यासाठी जैविक व रासायनिक प्रक्रिया, कीड नियंत्रण रोगनाशकांची फवारणी आणि फवारणी करताना घ्यावयाची काळजी आणि फवारणी करताना घ्यावयाची काळजी तसेच स्मार्टफोन मधील कृषीविषयक ॲप व त्याचा वापर याबद्दल माहिती सांगितली. यासाठी त्याला कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. जी. मोरे, कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. डी. गाडेकर, प्रा. दरंदले, प्रा. हुरुळे व इतर विषय तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी धनंजय सूर्यवंशी, बाबासाहेब सुरवसे, बाबुराव पवार, स्वानंद पवार, हनुमंत इटूकडे, किरण चव्हाण, इत्यादी शेतकरी बांधव उपस्थित होते.

 
Top