परंडा / प्रतिनिधी  - 

तालुक्यातील वाटेफळ येथे उपसरपंच संतोष भांडवलकर यांच्या वाढदिवसानिमित्त विश्वजन आरोग्य सेवा समिती उस्मानाबाद व ग्रामस्थ वाटेफळ यांच्या रक्तदान  शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यात ३५ जणाने केले रक्तदान ‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान‘ असे समजले जाते.

 राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. याच अनुषंगाने तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.

यावेळी बोलताना जय हनुमान विद्यालयाचे माजी प्राचार्य नारायण भांडवलकर म्हणाले, रक्तदान ही आजच्या काळाची गरज आहे. अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या घटना कानावर येतात. त्यामुळे तरुणाईने अधिकाअधिक रक्तदान करावे. शिबिरात मोठ्या प्रमाणात  तरुणांनी रक्तदान केले व सामाजिक कर्तव्य पार पाडले. सामान्य जनतेस हा मदतीचा हात मिळावा, या अनुषंगाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.ब्लड संकलन करण्यासाठी भगवंत ब्लड बॅंक बार्शी यांनी सहकार्य केले.

यावेळी विश्व जन आरोग्य सेवा समितीचे धाराशिव जिल्हाअध्यक्ष सोमनाथ कोकाटे,परंडा तालुका आरोग्यदूत  राहूल शिंदे, आरोग्य सेवा समिती सदस्य रविंद्र तांबे,आरोग्य समन्वयक साजिद शेख, तानाजी कासारे,माजी पंचायत समिती सदस्य दीपक भांडवलकर,सरपंच अश्विनी दीपक भांडवलकर, पोपट भांडवलकर, युवराज भांडवलकर,परमेश्वर भांडवलकर,   जयसिंग भांडवलकर , रणजित भांडवलकर, श्रीकांत भांडवलकर , दयानंद भांडवलकर , अण्णा नुस्ते, भाऊसाहेब लांडे, बंडू भांडवलकर , मनोज भांडवलकर , अजित नुस्ते यांच्या सह मोठ्या प्रमाणात युवक उपस्थितीत होते.

 
Top