तुळजापूर  / प्रतिनिधी-

 कोरोना प्रादुर्भाव कमी होत  असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने मंदीरे भक्तांना दर्शनार्थ खुले करण्याचा निर्णय घेतल्याने श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवात भाविकांना दर्शन घडल्याने भाविक धन्य धन्य होवुन सुखावला गेला .

श्रीतुळजाभवानी मातेचे शारदीय नवरात्रोत्सवातील पहिले पर्व निर्विघ्नपणे पार पडल्याने प्रशासनाला  दिलासा मिळाला आहे.

आता अश्विनी  पोर्णिमा दिनी शारदीय नवरात्रोत्सवातील अंतिम पर्व  असल्याने या पर्वाकडे सर्वाचा नजरा लागल्या आहेत. श्री तुळजाभवानी मातेचा भक्त प्रामुख्याने गरीब शेतकरी कष्टकरी वर्गातील आहे.तो देविजींचा उत्सव काळात लाखोचा संखेने येवुन देवदर्शन घेवुन देवीचरणी वारीखेटा पुर्ण करतो पण मागील वर्षी कोरोना प्रादुर्भावमुळे ते शक्य झाले नाही. कोरोनाचा पहिला टप्पा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर दि. १६ नोंव्हेंबर २०२० मंदीर भक्तांनसाठी उघडले व पुनश्च कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु लागताच ५ एप्रील २०२१ बंद केले. त्यानंतर कोरोना प्रादुर्भाव कमी होताच पुनश्च मंदीर भक्तांनसाठी घटस्थापने पासुन भक्तांनसाठी खुले केले.   हे करताना प्रशासनाने कोरोना वाढु नये म्हणून नवराञोत्सवात प्रतिदिन १५ हजार भाविकांना दर्शन मंदीरातुन देण्याचा निर्णय घेतला व परिस्थिती भाविकांचा ओघ पाहुन ही संख्या वाढवली .

 नवराञोत्सवात आलेल्या भाविकांना दर्शन अनपेक्षित रित्या घडल्याने व बराच महिन्यानंतर शारदीय नवरात्रोत्सवातील दर्शन घडल्याने भाविक सुखावला भाविका बरोबरच व्यवसाय चांगला झाल्याने अर्थिक संकटात सापडलेल्या व्यापारी वर्गाचा धंदा झाल्याने तो आनंदीत झाला . एकंदरीत जास्तीत जास्त भाविकांना दर्शन देण्याच्या निर्णयामुळे तिर्थक्षेञ तुळजापूरचे आर्थिक संकट काहीसे  कमी होण्यास आरंभ झाल्याचे बोलले जाते .

  मंञी, आमदार,खासदारांची मंदीयाळी !

श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवातील काळात सर्वच पक्षाचे मंञी, आमदार, खासदार यांनी सहकुंटुंब देवीदारी हजेरी लावुन सौभाग्यवती बरोबर देवीदर्शन घेवुन देविजींचा कुलधर्मकुलाचार केला. यात कर्नाटक, आंध्र, तेलगंणा राज्यातील आमदार, खासदार मोठ्या संखेने देवीदर्नशनार्थ आले होते.तसेच महाराष्ट्रातील  सामाजिक मंञी धनंजय मुढे यांनी सपत्नीक पुजाकरुन दर्शन घेतले. मंञी संजय बनसोडे बरोबरच अनेक आजी-माजी मंञी, आमदार, खासदार यांनी हा नवराञोत्सवातील दर्शन घेण्याचा मोह अवरला नाही .राज्याचे उपमुख्यमंञी यांनी ही शारदीय नवरात्रोत्सवातील देवीदर्नशनार्थ येण्याबाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस स्थानिक नेत्यांन बरोबर माहीती घेतली होती. माञ शारदीय नवरात्रोत्सवातील पोलिस प्रशासनावर सुरक्षाव्यवस्थेचा ताण नको म्हणून दौरा टाळल्याचे बोलले जाते. 


 
Top