उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्हा विद्यार्थी वाहतूक  संघटना यांच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या नुतन पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. संघटनेच्या कार्यालय नुतन अध्यक्ष श्री शशिकांत खुने यांचा सत्कार दयानंद नागापुरे  संस्थापक अध्यक्ष उस्मानाबाद जिल्हा विद्यार्थी वाहतूक संघटना यांचे हस्ते करण्यात आला. नुतन उपाध्यक्ष धर्मराज सुर्यवंशी यांचा सत्कार दिलीप देशमुख तर सचिव श्री. दत्तात्रय साळुंके यांचा सत्कार श्री पप्पू शिनगारे यांनी केला. 

यावेळी सुनिल मिसाळ, दत्ता जावळे, धनंजय साळुंके, संतोष घोरपडे,बापू माने,दादा सुरवसे, नेताजी मुळे, बापू देशमुख,निखिल घाडगे, जीवन जगदाळे, कालिदास व्हनकळस इ.कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top