उस्मानाबाद / प्रतिनिधी-

आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांचा परत एकदा भोंगळ कारभार करत असल्याचे सातत्याने दिसुन येत आहे. विद्यार्थ्यांना परत एकदा चुकीचे हॉल टीकीट देण्यात आले. शासनाने विद्यार्थ्यांचा परत एकदा मानसिक, आर्थिक व शारिरीक छळ करत आहे. 

दि २४ ऑक्टोबर २०२१ रोजी आरोग्य विभागाची वर्ग ‘क’ आणी वर्ग ‘ड’ ची होणारी परीक्षेचे वेळापत्रकामध्ये पुन्हा एकदा त्या प्ररिक्षार्थीचे परिक्षा केंद्र हे दुसऱ्या जिल्हयातील मिळाले असल्याचे दिसुन येत आहे.

आरोग्य विभागाने सदरील चुक लवकर दुरुस्त करुन त्या‍ परिक्षार्थींना योग्य व जवळचे परिक्षा केंद्र द्यावे अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा आपल्या विरोधात तिव्र आंदोलन छेडेल,अशा इशारा भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर यांनी दिला आहे. या प्रसंगी निवेदन देतांना उपनगराध्यक्ष अभय इंगळे, ओम नाईकवाडी, किशोर पवार, हिम्मत भोसले, प्रसाद मुंडे, वैभव देवकर, स्वानंद पाटील, अभिजित माळी, शिवशंकर ईत्यादी उपस्थित होते.


 
Top