उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भारतीय जनता पार्टी उस्मानाबाद वतीने   पूरग्रस्तांना मदत निधी म्हणून 101001 रुपये चा धनादेश  भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थिती मध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला. 

याप्रसंगी जिल्हा समन्वयक नेताजी पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. खंडेराव चौरे, जिल्हा सरचिटणीस प्रदीप शिंदे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, एससी मोर्चा जिल्हाध्यक्ष, प्रवीण सिरसाठे, भाजप नेते विनोद गपाट, युवराज ढोबळे, नगरसेवक प्रवीण पाठक, अजय यादव, भाजयुमो जिल्हा सरचिटणीस ॲड.कुलदीपसिंह भोसले, सुजित साळुंके, सूरज शेरकर, विशाल पाटील, प्रसाद मुंडे, सलमान शेख, सागर दंडणाईक व पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top