उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भारतातील सर्वात मोठा मॅनग्रोव्हज पार्क उभारून उस्मानाबादचे उद्योगपती शंकरराव बोरकर यांचे सुपुत्र यशस्वी उद्योजक अमोल बोरकर यांनी पर्यावरणासाठी एक नवा संदेश दिला आहे

  महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत कांदळवन कक्षाच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या राज्यातील पहिल्या मॅनग्रोव्हज पार्कची गोराई येथे पर्यावरण मंत्री तथा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांचे हस्ते पायाभरणी करण्यात आली. खारफुटी संवर्धनासाठी ही अभिनव संकल्पना मुंबईसारख्या शहरात आकाराला येत असल्याचा मला मनापासून आनंद असल्याचे मत अदित्य ठाकरे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले ८ हेक्टरवर या पार्कची निर्मिती होत असून १६०० चौरस मीटरचे इंटरप्रिटेशन सेंटर ८०० मीटरचा बोर्डवॉक आणि इको टुरिझमच्या अनुषंगाने या ठिकाणी विविध सुविधा उपलब्ध होणार आहेत या परिसराला निसर्ग पर्यटनाचे केंद्र बनवण्यासाठी प्रयत्नशील असणार असल्याचे मनोगत अमोल बोरकर यांनी व्यक्त केले...

       पुढे बोलताना बोरकर म्हणाले की, या पार्कमुळे खारफुटी कडे पाहण्याचा नागरिकाचा दृष्टीकोन नक्कीच बदलेल आणि अधिक जबाबदारीने आपण तिच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणार २०२३ पर्यंत हे पार्क सुरू होणार असून दुसरे पार्क दहिसर येथे उभा करण्याचा मानस देखील त्यांनी व्यक्त केला

    यावेळी महापौर किशोरी पेडणेकर खासदार गोपाळ शेट्टी विधान परिषदेचे सदस्य विलास पोतनीस आमदार सुनिल राणे वनसचिव वेणूगोपाल रेड्डी अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी जिल्हाधिकारी निधी चौधरी उद्योगपती शंकरराव बोरकर स्थानिकचे नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.

 
Top