उस्मानाबाद / प्रतिनिधी

अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात वाहून गेलेल्या देवळाली (ता. कळंब) येथील संभाजी शरणागत यांच्या कुटुंबियाला नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन निधीतून चार लाख रुपयांची आर्थिक मदत मिळवून देण्यात आली. ही आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व उस्मानाबाद - कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास घाडगे - पाटील यांनी प्रयत्न केले.

गेल्या पंधरा ते वीस दिवसांत उस्मानाबाद व कळंब तालुक्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यामुळे नदी, नाल्यांना पूर आला. या पुरात देवळाली येथील संभाजी शरणागत हे वाहून गेले. याची माहिती मिळताच खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास घाडगे - पाटील यांनी शरणागत कुटुंबियाला नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन निधीतून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. त्यानुसार संभाजी शरणागत यांच्या कुटुंबियाला नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन निधीतून चार लाख रुपयांची आर्थिक मदत मिळवून दिली.

यावेळी आमदार कैलास घाडगे - पाटील, उस्मानाबाद नगरपालिकेतील शिवसेनेचे गटनेते सोमनाथ गुरव, सरपंच अविनाश माळी, उपसरपंच अजित पाटील, किरण लोमटे, सुधाकर महाजन, राजेंद्र लोमटे, अमित लोमटे, तलाठी संभाजी तोगरे, पोलिसपाटील संदीप देशमुख आदी उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत शरणागत कुटुंबियाला चार लाखांचा धनादेश देण्यात आला.

 
Top