उस्मानाबाद / प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा (बुद्रूक) येथील शेतकऱ्यांना पाच एच.पी. क्षमतेच्या पाणबुडी पंपाचे सरपंच प्रशांत रणदिवे व भारतीय जवान अभिजीत रणदिवे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांनी जिल्हा परिषदकडे पाठपुरावा करून हे विद्युत पंप मंजूर करून आणले असून शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

सारोळा येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर गुरूवारी (दि.१४) लाभार्थी शेतकऱ्यांना पाणबुडी पंपाचे वितरण करण्यात आले. तसेच लाभार्थी शेतकऱ्यांचा फेटा बांधून यथोचित सत्कार करण्यात आला. सारोळा शिवारात यंदा चांगला पाऊस झाला आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांकडे पाणबुडी मोटर नसल्याने पिकांना पाणी देताना अडचणीचा सामना करावा लागत होता. हीच बाब ओळखून ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांनी शेतकऱ्यांचे परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे दाखल केले होते. तसेच मंजुरीसाठी वारंवार पाठपुरावा करून सर्व प्रस्तावास मंजुरी मिळविली. बुधवारी या पाणबुडी पंपाचे शेतकऱ्यांना वितरण करण्यात आले. कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले, नितीन पाटील, सुधाकर देवगिरे, ज्येष्ठ नेते सुरेश देवगिरे, रावसाहेब मसे, पंडीत खरे, बाबु खरे, महेश रणदिवे, पोलीस पाटील प्रितम कुदळे, नामदेव खरे, बालाजी मसे, सुरेश रणदिवे, राजेश मसे, तानाजी रणदिवे, राजाभाऊ नांदे, सतिश इसाके, रंगनाथ कुदळे, चंद्रकांत मसे, नूर शेख, शिवाजी मसे, कृष्णा कोळगे, राहुल रणदिवे, दत्ता मसे, सुदर्शन मसे, शैलेश शिंदे, कलीम शेख, सुरज रणदिवे, विशाल कुदळे, व्यंकट परीट, हमीद मुजावर, पांडूरंग रणदिवे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

 
Top