परंडा / प्रतिनिधी : - 

येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयांमध्ये नॉलेज रिसर्च सेंटर आणि नॅशनल डिजिटल लायब्ररी व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनार आयोजित करण्यात आले होते .त्यावेळी प्रियदर्शनी महिला महाविद्यालय वर्धा येथील ग्रंथपाल डॉ प्रतिभा ताकसांडे यांनी वरील उद्गार काढले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ दीपा सावळे या उपस्थित होत्या. महाविद्यालयातील राष्ट्रीय डिजिटल ग्रंथालयाच्या वतीने सदर राष्ट्रीय वेबिनार चे आयोजन करण्यात आले होते .यावेळी राष्ट्रीय डिजिटल लायब्ररी चे अध्यक्ष तथा आय क्यू ए सी चे चेअरमन डॉ महेशकुमार माने ,सचिव तथा ग्रंथपाल डॉ राहुल देशमुख ,सदस्य तथा प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ अतुल  हुंबे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रीय वेबिनार च्या प्रमुख मार्गदर्शिका मध्ये प्रियदर्शनी महिला महाविद्यालय वर्धा येथील डॉ प्रतिभा ताकसांडे यांनी “इम्पॉर्टन्स ऑफ इनक्युलकेट रेडींग हॅबिट्स फ्रॉम अरली एज” आणि भोगावती महाविद्यालय कुरुकली कोल्हापूर येथील ग्रंथपाल प्रशांत कल्लोली यांनी “हाऊ टू कंट्रीब्युट इन विकिपीडिया” या विषयावर आपले व्याख्यान दिले .    सदर  राष्ट्रीय वेबिनार ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आले. डॉ राहुल देशमुख यांनी सर्व तांत्रिक व्यवस्थापन केले. डॉ सचिन चव्हाण यांनी पाहुण्यांचा परिचय दिला. 

 पुढे बोलताना डॉ प्रतिभा ताकसांडे म्हणाल्या की  वाचनाने मनुष्य निसर्गाच्या जवळ जातो .त्याची संवेदनशीलता वाढते .त्याच्यामध्ये  समजुतदारपणा येतो. त्याच्यामध्ये व्यवहारिक शहाणपण येते, वाचनाने संवादाचा एक अंत प्रवाह सतत सुरू राहतो .वाचन हा आत्मशोधाचा सगळ्यात जवळचा मार्ग आहे. तर डॉ प्रशांत कल्लोली  यांनी ऑनलाइन गुगलमध्ये माहिती कशी आड करावी यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्या डॉ दीपा सावळे यांनी सांगितले की, आजच्या पिढीवर चांगले संस्कार करण्यासाठी त्यांना वेगवेगळी पुस्तके देऊन वाचनास प्रोत्साहित केले पाहिजे. सद्यस्थितीत तरुण पिढी जी देशाचे भवितव्य आहे ती वाचनापासून कोसो दूर गेली आहे .आपला ताणतणाव कमी करण्यासाठी प्रत्येकाने वाचन केले पाहिजे, वाचनामुळे माणसाला माणसाच्या अस्तित्वाची जाणीव होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ राहुल देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार डॉ विद्याधर नलवडे यांनी मानले. शेवटी शहीद पोलिस स्मृतिदिनानिमित्त देशात शांतता आणि सुरक्षितता सत्तेसाठी कर्तव्य बजावताना प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह राज्यातील अनेक प्राध्यापक संशोधक सहभागी झाले होते.

 
Top