परंडा / प्रतिनिधी : - 

परंडा तालुक्यातील श्रीधरवाडी येथील वाटेफळ साठवण तलावाच्या खालच्या बाजुस महावितरण विद्युत कंपनीच्या हलगर्जीपणा व गलथान कारभारामुळे दहा ते अकरा एकर उभा ऊस विद्युत तारेच्या घर्षणामुळे जळुन खाक झाला आहे.यामध्ये मच्छिंद्र मोहिते, मारूती मोहिते, शिवाजी मोहिते, भुजंग मोहिते, आजिनाथ मोहिते, लक्ष्मण मोहिते ह्या शेतकऱ्यांचे खुप मोठे नुकसान झाले आहे.

ऊसाला बुधवारी अदांजे बारा ते एक  वाजता आग लागली धुराचे प्रचंड लोट सुरू झाल्यामुळे गावातील लोकांनी जळणाऱ्या ऊसाकडे धाव घेतली परंतु आगीचा वेग जोरात असल्याने आग आटोक्यात आणणे शक्य झाले नाही. महावितरण विद्युत कपंनीचा हलगर्जीपणामुळे मोठे सकंट कोसळल्याने शेतकरी हताश झाला आहे. तसेच या परिसरातील शिवारातुन विजेचे खांब टाकण्यात आले आहेत मात्र महावितरणकडून योग्य देखभाल केली जात नाही त्यामुळे विद्युत तारेच्या घर्षणामुळे ही घटना घडली आणि शेतकऱ्यांच्या डोळया देखत ऊस जळत होता तसेच शेतकऱ्यांना अगोदरच कोरोनाचे आस्मानी सकंट, अतिवृष्टी असताना ह्या ओढवलेल्या सकंटामुळे शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मागणी होत आहे.

“ वाटेफळ सज्जाचे तलाठी यांनी घटनास्थळास तात्काळ भेट देऊन सदरील घटनेचा पंचनामा केला व शेतकऱ्यांस तात्काळ मदत देण्याचे आश्वत केले. 

 
Top